तालुका प्रतिनिधी
मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- तलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील झालेल्या अवैध्य मुरूम उत्खनन प्रकरणी मा. मुख्य का.अ.जि. परिषद बीड यांच्यासमोर झाली .सुनावणी. अधिकारात मागवली शंकर शिंदे यांनी संपूर्ण माहिती
माननीय विभागीय आयुक्त यांच्या चौकशी पत्रकानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या न्यायदालनात दिनांक 31/07 /2024 रोजी तलवाडा ग्रामपंचायत महिला सरपंच मिना विष्णु हात्ते व ग्रामसेवक मस्के तसेच तक्रारदार शंकर शिंदे यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास पत्रकाद्वारे कळवून तलवाडा येथील सरकारी गायरान गट नंबर 1565 ( पाझर तलाव ) येथून सन 2021 मध्ये मुरमाचे अवैधरीत्या उत्खनन व चोरटी वाहतूक करण्यात आली होती. शासनाचा लाखो किंवा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला गेला , तसेच पाझर तलावा मधील मुरुम उत्खनन करण्यास शासनाची कोणत्याही प्रकारचे परवानगी नसताना., आणि विशेष म्हणजे पाझर तलावातून मुरुम उत्खनन करण्यास कायदेशीर रित्या परवानगी नसतेच, किंवा कुठलाही अधिकारी तलावातुन मुरूम उत्खननास परवानगी देतच नाहीत . तरीसुद्धा सदर ठिकाणाहून अवैधरित्या 1000 ते 1500 ब्रास मुरमाचे उत्खनन करण्यात आले . सदर प्रकरणी तक्रारदार शंकर शिंदे यांनी वारंवार शासन दरबारी – मा.मुख्य सचिव , महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई 32. लोक आयुक्त व उप – लोकायुक्त यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई -32. विभागीय आयुक्त संभाजीनगर येथे तक्रार करून पाठपुरावा केल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे. करिता तलवाडा ग्रामपंचायत महिला सरपंच व ग्रामसेवक तसेच तक्रारदार शंकर शिंदे यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास कळवून सुनवणी घेण्यात आली.
सदर प्रकरणाच्या सुनावणीचे निकाल पत्र व रोजनामा मिळवण्यासाठी तक्रारदार शंकर शिंदे यांनी माहिती अधिकार मध्ये मागवली माहिती.