ढाणकी प्रतिनिधी : प्रशांत आरेवाड
आज देशात शाळेत होत असलेले अल्पवीन मुलीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कितीतरी अत्याचार दिवसाला होत आहे. पोलीस स्टेशनला काही तक्रारी नोंद होतात. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. या अंधारातल्या घटना उजेडात आणण्यासाठी सरकारने प्रत्येक शाळेवर सी.सी.टी.व्ही.लावण्याचे आदेश दिले.
सरकारच्या आदेशाच्या पालन करत बिटरगाव -ढाणकी चे कर्तव्य दक्ष आणि अनुशासन म्हणून ख्याती असलेले ठाणेदार प्रेम केदार,महिला वअल्पवयीन मुलीच्या संरक्षणसाठी ऍक्शन मोडवर आले आहे.
त्यांनी बिटरगांव पोलीस ठाणे तर्फे सर्व शाळांना सी.सी.टी.व्ही बसवणे बाबत पत्र व्यवहार केले असुन त्यांनी गावातील पालकांना अनुरोध केले आहे की ते देखील आपले पाल्य ज्या शाळेत जातात त्या शाळेचा परिसर सी.सी.टी.व्ही.चे कक्षेत असल्याचे खात्री करून घ्यावे , तसेच त्यांनी स्कुल बस मधील चालक व केअर टेकर यांना गणवेशात राहणे बाबत समज दिली असून या नंतर सदर लोक गणवेशात नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व त्यांचे लायसन्स रद्द साठी आर टी ओ यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगितले.तसेच ज्या बस मध्ये मुली प्रवास करणार आहेत त्या बस मध्ये बस निघाल्यापासुण महिला अटेंडंट असल्याची खात्री देखील पालकांनी करून घ्यावी.सदर बाबत योग्य ती काळजी व्यवस्थापना कडुन अथवा बस पुरवठा दारांकडुन न घेतली गेल्यास बिटरगांव पोलीसांतर्फे कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार प्रेम केदार यांनी सांगितले.
चौकट
सर्व पालकांना व सुज्ञ नागरिकांना पोलीसांतर्फे अवाहन करण्यात येते की,अल्पवयीन मुलीचे किंवा मुलाच्या बाबतीत कोणताही अपराध घडला असल्याचे निदर्शनास आल्यास सदर बाबत गुन्हा दाखल करण्यास पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करावा या बाबत कुणीही दिलेली तक्रार घेण्यास पोलीस कटीबध्द आहेत
ठाणेदार बिटरगांव पोलीस स्टेशन