संभाजी ब्रिगेड,सोशल मिडिया काँग्रेस कमिटी,यवतमाळ च्या वतीने मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
अवधूत खडककर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी,
यवतमाळ:-छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला,त्यासाठी दोषी असलेले मंत्री रविंद्र चव्हाण व ईतर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.आम्ही आपणास या निवेदनाच्या माध्यमातून अतिशय गंभीरतेने कळवू इच्छितो की,छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा,अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे.असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेले होते.भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे.या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे.त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेड, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,व संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे.आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे आपण ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची तीव्र मागणी आहे. दरम्यान सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर,प्रा.पंढरी पाठे,अनिल चवरे,संदीप आडे,घनश्याम कांबळे,करीम पठाण,गणेश थुल,निलेश मेश्राम,प्रज्वल तूरकाने,अजित गजभिये,शुभम तेलगोटे,जीत पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती.