डॉ विनायक गायकवाड
पुरंदर
पुरंदर : नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट, व समस्त ग्रामस्थ बोपगाव, यांच्या वतीने हजारो भाविकांचे श्रद्धा स्थान श्रीक्षेत्र कानिफनाथ गड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 27/ 8/ 2024 रोजी सकाळी 5. ते 7.अभिषेक व पूजा करण्यात आली. सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ बोपगाव,व कानिफनाथ मळा भजनी मंडळ बोपगाव, व तसेच बाहेर गावाहून आलेले भजनी मंडळ,यांचा श्रीकृष्ण जन्मावर सुरेल असा भजनाचा कार्यक्रम झाला,12.वाजता महा आ रती होऊन बरोबर 1.वाजता कानिफनाथांचे भक्त सर्जेराव (नाना )जगदाळे यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ,पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमानात भाविक भक्त उपस्थित होते,दहीहंडी फोडल्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ देवस्थान पंचायत कमीटी ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,खजिनदार, व सर्व संचालक मंडळ, यांनी केले होते.तसेच बोपगाव मधील सरपंच सर्व सदस्य,सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य, गावातील तरुण मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.