बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील पहिली ते सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी या सणामध्ये उत्साहाने भाग घेतला. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये एकत्रितपणे काम करण्याची आणि सहकार्याची भावना निर्माण झाली.
उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व रधेचा वेशभुषेत येऊन पारंपारिक गाणी व नृत्य सादर केले त्यानंतर मुलांनी तीन थर रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. यावेळी शाळेतील उपक्रम शिक्षक श्री आप्पासाहेब उगले यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कांताभैय्या शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील हेलवाडे शिक्षक देविदास नागरगोजे, दिलीपकुमार खराद, ज्ञानदेव पवार,वैभव पवार, श्रीमती अनिता गावडे, मनिषा चव्हाण यांनी या उत्सवाचे यशस्वी आयोजन केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून आला, आणि त्यांनी पुढील वर्षीही असा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली.