गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी महागाव
येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा राहूर येथे फुलसावंगी केंद्राची शिक्षण परिषद व राहूर शाळेचे मुख्याध्यापक श्री. अतुलजी होले यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,श्री. जितेंद्र कदम,उपाध्यक्ष गजानन तोरणपवार,महागाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड,अमोल जाधव,फुलसावगी केंद्रातील सर्व शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक,तसेच केंद्रातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक शिक्षिका आणि पत्रकार बंधू उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थीनिच्या सुमधूर स्वागत गीताने मान्यवराचे स्वागत झाले.शाल व पुष्पगुछ देऊन प्रमुख अतिथीचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मुख्याध्यापक शिंदे यांनी केले. केंद्रातील जेष्ठ शिक्षक झाकीर शेख, विनोद कांबळे, श्री.काळे,यांनी अतुल होले यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला.विस्तार अधिकारी बेतेवाड, व अमोल जाधव प्रशासकीय बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती अतुल होले यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा आपल्या शब्दात व्यक्त केला. त्यांच्या भाषणाने उपस्थित सर्वांचे ह्रदय भरून आले.त्याचबरोबर या शाळेप्रति आपली दातृत्वाची जाणीव ठेवून त्यांनी शाळेला ५ फॅन व ५ घड्याळ भेट म्हणून दिल्या..या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. शिवानंद शिंदे व सर्व शिक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.
सुत्रसंचालन विभूते यांनी आपल्या खास शैलीत सादर केले. तर आभार प्रदर्शन शफीसर यांनी केले.