तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये -चिमूर
चिमूर : श्री बाबा रामदेवजीं चा २९ वा विशाल जम्मा जागरण सह विविध कार्यक्रम दिनांक ४ व ५ सप्टेंबर ला द्विदिवशीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक ४ सप्टेंबर २४ ला रात्री १० वा श्री रामदेव बाबा चे परम भक्त हैद्राबाद निवासी सुशील गोपालजी बजाज आणि सहकारी यांच्या उपस्थितीत जम्मा जागरण भजन संध्या सुरवात होईल. दिनांक ५ सप्टेंबर ला सकाळी ५ वा भजन संध्या आरती नंतर दुपारी ३ वा. पासून ६. ३० वा पर्यत कलश शोभा यात्रा ही दुकान लाईन श्री बाबा रामदेव मंदीर मधून प्रारंभ होणार आहे.
सायंकाळी ६. ३० वा संध्या आरती होऊन रात्री ७. ३० वा पासून आगमन पर्यत महाप्रसाद आयोजित केलेला आहे. भक्त गनानी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे श्री रामदेव बाबा भक्त मंडळ चिमूर यांनी केले आहे.