ग्रामीण प्रतिनिधी
संतोष अटकर उगवा
उगवा येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कावड शोभायात्रेचे आयोजन विविध मंडळाच्या वतीने अतिशय आनंदात व उत्साहात करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गांधीग्राम वाघोली येथून पूर्णा नदीचे जल कावडणे आणून त्या कावडची शोभायात्रा वाजत गाजत फटाक्याच्या अतशबाजित संपूर्ण उगवा गावातून काढण्यात आली.कावड शोभायात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी रांगोळ्या फुलांची सजावट करून ठिकठिकाणी महिलांनी पूजन करून शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.या शोभायात्रेमध्ये संत गजानन महाराज शिवभक्त मंडळ राम राज्य ग्रूप, संत रोहिदास महाराज शिवभक्त मंडळ चर्मकार ग्रूप,रुद्र शक्ति शिवभक्त मंडळ त्रिकाल ग्रूप, व ओम कारा ग्रूप या चार मंडळाचा समावेश होता. यामधे विविध देखावे सादर करण्यात आले होते. व उगवा येथे प्राचीन मंदिर मोरेश्वर महादेवाला जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात आला.