नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शहर प्रतिनिधी
जितेंद्र. लाखोटीया, तेल्हारा
आज वान प्रकल्प आज दि. ०२/०९/२०२२४ रोजी रात्री १२:३० वाजता वान प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग ७९.४२ घ.मी./से. वरून वाढवून १६५.३३ घ.मी./से. (५८३८ Cusec) एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाचे ४ वक्रद्वारे प्रत्येकी ५० सेंमी उंचीने उघडुन नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाचे युधिष्ठिर भांगडिया सहाय्यक अभियंता वान प्रकल्प व्यवस्थापन उप विभाग तेल्हारा व वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर , वान प्रकल्पात 88% जलसाठा झाल्या मुळे यावर्षी सुद्धा सदरहू धरण भरणार असल्याचे दिसत आहेत.तेल्हारा पासून जवळच अकोला, अमरावती, बुलढाणा, या तीन जिल्ह्यां च्या सीमेवर वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे. येथील जलाशया ला हमूमान सागर असे नाव दिले आहे. ह्या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो गावे आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे. याच प्रकल्पातून 84 खेडी पाणी पुरवठा योजना आहे. एवढेच नव्हे तर ह्या पाण्या च्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या धरणाची विशेषता म्हणजे एखादा अपवाद वगळता हे धरण दरवर्षी शंभर टक्के पूर्ण भरते. अकोला जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच सातपुडा पर्वतातील मेळघाट क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे ह्या वर्षी “वरदान प्रकल्प” भरते की नाही अशी चिंता जुलै महिन्यात शेतकरी बांधवांसह सर्वांनाच लागली होती. परंतु मागील 12 तासा पासून तेल्हारा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे धरण जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. आतापर्यंत जलसाठा 88% टक्के वर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात समाधान कारक पाऊस पडत असल्या मुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस जोरदार वृष्टी होणार आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा वारी हनुमान सागर पूर्णता भरणार यात तिळमात्र शंका नाही. हनुमान सागर मधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती ओलित केल्या जाते. हनुमान सागरातून निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू , चना ,भुई शेंग व उन्हाळी मूग इतर बरेच पिके घेतात.वान परिसरात काल पासून सुरू असलेले संततधार पावसा मुळे परिसरातील शेतकरी आनंदित दिसत आहे. वारी हनुमान सागर अकोला बुलढाणा या दोन जिल्ह्यां साठी वरदान आहे. तरी यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पावसाने पुन्हा श्री हनुमान सागर मध्ये 88% जलसाठा झाला आहे.अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया सहाय्यक अभियंता वान प्रकल्प व्यवस्थापन उप विभाग तेल्हारा व शाखा अभियंता नयन लोणारे यांनी दिली आहे.