तालुका प्रतिनिधी
मारोती गाडगे / गेवराई
गेवराई (बीड):- सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळ! पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैल वर्षभर शेतात कष्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते. बैल आपला पोशिंदा आहे. त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला ‘बैलपोळा’ असेही म्हणतात.
बैलपोळ्यानिमित्त बैलाला सजविण्यासाठी लागणारे साहित्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे
सोमवारी पोळा असल्याने सजावटीचे साहित्य खरेदी करत असताना शेतकरी बांधव
पोळा हा सण श्रावणातल्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी बैलांच्या कष्टांना सुट्टी असते. त्यांना त्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते. आंघोळ घालून सजवले जाते. त्याला ओवाळून त्याची पूजा केली जाते. त्याला वरणापुरणाचे जेवण जेवू घातले जाते. नंतर त्याची मिरवणूकही काढली जाते
हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो. शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात…
पोळा,,(एम एस गाडगे)