अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधी अहेरी
*काँग्रेसनेते अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली...!*
अहेरी. : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री.महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवस निमित्त विविध उपक्रमाने मोठ्या थाटात संपन्न झालं आहे.
काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे माजी सभापती आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेबांचा मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थित महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवस निमित्त स्थानिक अहेरी मूकबधीर शाळेतील विध्यार्थ्यांसोबत केक कापून साजरा करण्यात आली.
तसेच शाळेतील विध्यार्थ्यांना बॅग,बुक,पेन,फळ बिस्कीटसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आली आहे.त्यावेळी विध्यार्थी शिक्षक वृद महेंद्रभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळल्याने विध्यार्थ्यांचा चेहऱ्यावर आनंदाची वातावरण दिसून आला.तसेच परिसरातील नागरिकांना ताडपत्री सुद्धा वाटप करण्यात आली आहे.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,चंदू बेज्जलवार,अज्जू पठाण,स्वप्नील मडावी,रजाक पठाण,बबलूभाऊ सडमेक,हनिप शेख,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,प्रकाश दुर्गेसह शिक्षक व विध्यार्थी तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.