जिल्हा प्रतिनिधी
विनोद के नायडू / गडचिरोली
मुतनुर येथे मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून होत आहे विविध विकास कामे! चामोर्शी तालुक्यातील मुतनूर पर्यटन स्थळ विकासासाठी राज्य सरकारने 50 कोटी रुपयाची तरतूद करावी!दिनांक २४ सप्टेंबर 202४ चामोर्शी तालुक्यातील मुतणुर येथील पहाडीवर असलेल्या आदिवासी समाजाचे राजाराणी पौराणिक देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पहांदी पारी कुपार लींगो देवस्थान येथे राज्यभरातील भाविक भक्त दरवर्षी गुढीपाडव्याला आयोजित दोन दिवसीय यात्रा व वार्षिक पूजन कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावतात. व विविध जिल्ह्यातील पर्यटक दररोज येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून उंच पहाडीवर असलेल्या देवस्थानाचे आस्थेने दर्शन घेतात व येथे असलेल्या अप्रतिम निसर्गरम्य वातावरण व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटतात गेल्या अनेक वर्षापासून येथील विकासासाठी सदर पर्यटन स्थळ क वर्ग दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे अविरत कार्य केले व या स्थळास राज्य सरकारचा (क )वर्ग गट पर्यटन स्थळ दर्जा मिळवुन घेतला व मुतनुरचा चेहरा मोहरा संपूर्णपणे कायापालट करण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा येथे भेट देत आहेत *आणि येथील गावकरी व नागरिकांसोबत चर्चा करीत असतात येथे आतापर्यंत प्रणय भाऊ यांच्या पुढाकाराने लोकसभागातून विविध विकास कामे पूर्ण केले आहेत व या स्थळास पुन्हा विकास करण्यासाठी नेहमी राज्य सरकार सोबत पाठपुरावा करणे अविरत सुरू ठेवले आहे सदर ठिकाणी आतापर्यंत राज्य सरकारकडून पायऱ्याचे बांधकाम सभामंडप व बोरवेल बांधकाम तसेच श्रमदानातून मंदिराचे बांधकाम झालेले आहे परंतु या ठिकाणी प्रणय भाऊ खूणे यांच्या पुढाकारातून स्वखर्चाने 50 लाख रुपये खर्च करून मध्यंतरी दुर्गा माता मंदिराचे व खाली गणपती आणि हनुमान मंदिराचे बांधकाम जोमाने सुरू आहे तसेच या परिसराच्या सौंदर्यात आणखीन भर घालण्यासाठी प्रणय भाऊ यांनी राजस्थान येथून संगमवरी दगड व कोरीव बांधकाम करणारे कलाकार यांना पाचारण केलेले आहे सदर काम जोमाने सुरू आहे सदर स्थळ निसर्ग रम्य आहे परंतु येथे पुन्हा पर्यटकांनी मोठ्या संख्येने यावे याकरिता गावाच्या मधात छोटा तलाव सौंदर्यीकरण करण्यात येत आहे येथे तलावाच्या मध्यभागी पाण्याचे फवारे करण्यासाठी व या ठिकाणी बोटिंग व्यवस्था करण्यासाठी प्रणय भाऊ यांचे नियोजन सुरू व सदर काम अर्ध्याधिक झाले आहे व सध्या या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी पायरीला रेलिंग मंदिराचे सौंदर्यकरण सिमेंटचे संरक्षण वॉल गेट बांधकाम इतर सौंदर्यकर्णाचे काम जोमाने सुरू आहे या कामाकरिता येथील माजी खासदार अशोक भाऊ नेते व विद्यमान आमदार महोदय यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच या ठिकाणी असलेले चारही पहाडी पर्यंत रोप वे झुला, पाण्याची व्यवस्था ,भाविक भक्तांना राहण्यासाठी उत्तम निवासाची व्यवस्था गेस्ट हाऊस व या ठिकाणी रोजगार निर्माण होण्यासाठी दुकान गळ्याचे बांधकाम प्रस्तावित आहेत याकरिता राज्य शासनाने या ठिकाणचा उत्कृष्ट पर्यटन स्थळ विकास करण्यासाठी 50 कोटी रुपये निधीची तरतूद करावी अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी केले आहे , येथील गाव पाटील शत्रू नरोटे व गावकरी यांच्यासोबत नेहमी भेटीगाठी द्वारे चर्चा करून विविध विकास कामाचे नियोजन सुरू आहेत आणि मुतनुरचा कायापालट करण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहे याबद्दल मुतनुर येथील स्थानिक नागरिक यांनी प्रणय भाऊ यांना आवश्यक तो लोकसहभाग देण्याचे आश्वासन दिले आहे सध्या तरी विविध अंगी सर्वांग सुंदर वनव्याप्त अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला मुतनूर विकासाकडे वाटचाल करतोय.