फोफलिया परिवार द्वारा भागवत कथेचे आयोजन
शहर प्रतिनिधि
जितेंद्र लाखोटीया,तेल्हारा
हिवरखेड वार्ताहर
हिवरखेड येथील फोफलिया परिवाराने माहेश्वरी भवन बालाजी मंदिर येथे त्रिलोकीनाथ महाराज वृंदावणवाले यांच्या संगीतमय भागवत कथेचे आयोजन केलेले आहे. यात त्रिलोकीनाथ महाराजांच्या सुमधुर व रसाळ वाणीने हिवरखेड वासी मंत्रमुग्ध झालेले असून भागवत श्रवण करणाऱ्यांची एकच गर्दी आयोजन स्थळी होत आहे. भागवतातील प्रत्येक प्रसंग त्रिलोकीनाथ महाराज जिवंत करून सांगत आहेत व त्यानिमित्ताने वेगवेगळ्या झाक्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. विशेषतः कृष्ण जन्म, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह, वामन अवतार इत्यादी झाक्यानी भक्तांना संमोहित केले. ही भागवत कथा यशस्वी होण्यासाठी रामदेवबाबा सेवा समिती हिवरखेड, माहेश्वरी समाज महिला मंडळ हिवरखेड प्रचंड परिश्रम घेत असून या भागवत कथेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. गुरुवारी भागवत कथेची समाप्ती असून भागवत भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र फोफलिया, मोतीलाल फोफलिया, घनश्याम फोफलिया, अशोक फोफलिया, सूरज फोफलिया, सुजित फोफलिया व माहेश्वरी समाज हिवरखेड यांनी केले आहे.