अवधूत खडककर
प्रतिनिधी जिल्हा यवतमाळ
उमरखेड: (प्रतिनिधी) कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा २०-२२ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिवार फेरीस भेट देऊन कृषी विद्यापीठाच्या विविध नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती मिळवली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी फळे, फूले व भाजीपाला, औषिधी वनस्पती, दुगधव्यवसाय आणि इतर नगदी पिकासंदर्भातील विकसित तंत्रज्ञान व या शेत मालाचे मूल्यवर्धित उत्पादने, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, डाळ व खाद्यतेल प्रक्रिया व भरडधान्य मूल्यवर्धित उत्पादन तंत्रज्ञान तसेच विद्यापीठाच्या स्मृती केंद्रामध्ये संकलित केलेले विद्यापीठाचे विविध शाखांमधील अद्यावत तंत्रज्ञान, विविध पीक प्रात्यक्षिके पाहिली व यांच्या बाबत तंत्रज्ञानाचे अवलोकन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रमुख अतिथी म्हणून पाणी फाऊंडेशन चे आमिर खान यांनी देखील शिवार फेरीस आपला सहभाग नोंदवला. या शिवार फेरी कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र राज्या चे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्त्ते करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी शेतकरी व विद्यार्थी यांचा सहभाग व त्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळेल याची योग्य पद्धतीने दखल घेत यशस्वीरित्या शिवार फेरीचे आयोजन केले होते.
भेटीदरम्यान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक एस. के. चिंतले सहाय्यक प्राध्यापक ए. बी. इंगळे व सहाय्यक प्राध्यापिका के. आर. सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत केली. नव तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कृषी महाविद्यालय उमरखेड आपल्या विद्यार्थ्यांना दर वर्षी कृषी प्रदर्शन, ऍग्रोटेक, प्रक्रिया उद्योग, राज्य स्तरीय कृषी चर्चा सत्र अशा अनेक कार्यक्रमा मध्ये सहभाग घेण्यात येतो.