(काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न )
ढाणकी प्रतिनिधी : प्रशांत आरेवाड
तालुक्यातील ढाणकी, सावळेश्वर, पिरंजी, मोरचंडी, गांजेगाव, निंगनुर, बाळदी, बंदीटाकळी या गावातील जवळपास 560 युवकांनी, काँग्रेस नेतृत्वाच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा येथील आर्यवंश भवन येथे शनिवारी दुपारी 2 च्या दरम्यान पार पडला. या प्रवेश सोहळ्याने ढाणकी व बंदी भागात काँग्रेसची लहर निर्माण झाली आहे. ढाणकी येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात ढाणकी, सावळेश्वर, पिरंजी, मोरचंडी, गांजेगाव, निंगनुर, बाळदी, बंदीटाकळी येथील इतर पक्षातील जवळपास 560 कार्यकर्त्यांनी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश घेतला . यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले. सध्याच्या भाजप सत्ता काळात शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे. शेतपिकाला भाव मिळत नाही , उत्पादन खर्च महागाईमुळे वाढला आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर राज्य करणारे त्यांनाच शिवीगाळ करताना दिसत आहेत. बेरोजगारी वर कुठलेही काम केलेल नाही. उलट राज्यातील कंपन्या परराज्यात पळविण्याचे काम केल आहे. असा घनघात भाजप सत्ताधाऱ्यांवर करण्यात आला . पक्षात येणाऱ्या कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे यासाठी तन-मन-धनाने झटणार असल्याचे तातू भाऊ देशमुख यांनी सांगितले. विधानसभेत भाजप आमदाराची वागणुकीबद्दल बोलताना रामदेव देवसरकर म्हणाले , सध्या कोणत्याही आफिसवर जा पैसे दिल्याशिवाय जनतेचे काम होत नाहीत. एवढा भ्रष्टाचार फोपावला आहे. की पैसे देऊनही लोकांना फिरवले जात आहे.सोबतच आमदाराकडे नागरिकांनी काम घेऊन गेल्यास आमदारांना प्रश्न पडतो , की हे काम मी करावे, की आपल्या बॉसला द्यावे. नंतर त्याची टक्केवारी ठरवून काम करण्यात येते अशी पद्धत यापूर्वी कधीच मतदारसंघात पाहिली नसल्याची खंत राम देवसरकर यांनी बोलून दाखवली. सोबतच उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांना सूचना देत पक्षश्रेष्ठी तिकीट कोणालाही मिळो, बाकीच्यांनी एक मनाने राहण्याची विनंती करण्यात आली. सुभाष भाऊ गायकवाड भाजपा चे कार्यकर्ते यांनी सुद्धा काँग्रेसवर विश्वास ठेऊन पक्ष्या मध्ये प्रवेश केला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, रामदेव देवसरकर,गोपाल अग्रवाल, दत्तराव शिंदे, बाळासाहेब चंद्रे अमोल तुपेकर, हमीद कुरेशी, तालीब शेख, साहेबराव कांबळे, दादाराव गव्हाळे , सुभाष नाईक , महेंद्र कावळे, सुभाष गायकवाड, अजय माहेश्वरी , मीनाक्षी सावळकर, सविता घोडे, राहुल काळंबांडे, प्रमोदिनी रामटेके , इम्रान पठाण , जहीर भाई जमीनदार, रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, कविता पोपुलवाड, कयाम नवाब, पीसी भोळे, इरफान मस्तान, साहेबराव वाघमोडे, प्रवीण जैन, रुपेश भंडारी, ओमा पाटील चंद्रे बंटी भाऊ वाळके गजानन मिटकरे आदी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोपेवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन काँग्रेस शहर अध्यक्ष आमोल तुपेकर यांनी मानले.