देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
गोंदिया. 13 ऑक्टोबर ला टी बी टोली परिसरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी गोंदिया विधान सभा चे विधायक विनोद अग्रवाल यांच्या अनेक कामांचा कौतुक केला त्यांनी सांगितले की लाडली बहिन योजना शुरू केला कारण मध्यप्रदेश चे माजी मुख्यमंत्री व गोंदियाचे जावयी शिवराज सिंग चौव्हान ह्यांनी लाडली बहीन ही योजना शुरु केली होती त्याच प्रमाणे आपण शुध्दा ही योजना राबविण्यात यावी अशी विनंती केली व ही योजना शुरु केली विरोधकांनी अनेक प्रश्न निर्माण केले चुकीची माहिती लोकाना सांगायचे पण ते अपयश झाले आज सर्व लाडकी बहीणाचा खात्यात बरोबर पैसे येत आहे व त्यांनी सांगितले की डांगुर्ली बैराज बनविण्यासाठी विनोद अग्रवाल ह्यानी अनेकदा विचारत होते की केव्हा मंजुर होणार असी विनंती केली आणि त्यांना डांगुर्ली बैराज बनविण्याकरिता ३९५ कोटी मंजुर केले त्यांनी विधायक विनोद अग्रवाल यांचे कामाचे खुप कौतुक करत म्हणाले की माझ्या सोबत काम करण-या अनेक मंत्री व सहकारी होते पण विनोद अग्रवाल यांनी जे कामे पाँच वर्षात केले हे कौतुक करण्यासारखे आहे विनोद अग्रवाल हे काही वेळ पक्षा तुन बाहेर होते त्यावेळी आम्ही चुकलो आम्हाला माहितच नोहता की विनोद अग्रवाल मोठा झाला आहे पण विनोद अग्रवाल हे नेहमी बी जे पी पक्षाचे होते त्यांनी मी जसे बोलत होतो तसे हे करीत होते त्यानंतर म्हटले की पक्षा चा झेंडा हातात घेत व विधान सभा क्षेत्रा चा विकास झाला पाहिजे लाडका भाऊ करिता शेतक-याची विज चे बिल शुन्य करण्यात आले मुली साठी योजना अशी योजना आपण राबवित आहो व व विनोद अग्रवाल ह्याची मागणी आहे की शेतक-यांना २० हजार हेक्टर देत होते आता २५ हजार पाहिजे अशी माग करितआहे देवेंद्र फडणवीस ह्यांनी २५ हजार हेक्टरी देणार असे सांगितले
गोंदियातील टीबी टोली मैदानावर भाजपच्या वतीने आयोजित कर्तव्यनिष्ठ जन आशीर्वाद महासंमेलनात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ.परिणय फुके, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार संजय पुराम, केशवराव मानकर, भेरसिंगभाऊ नागपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष येसूलाल उपराडे, विजय शिवणकर, जिल्हा संघटन मंत्री वीरेंद्र (बाळाभाऊ) अंजनकर, जि.प.चे अध्यक्ष पंकज रहांगडाले, नेतराम कटरे, पंस सभापति मुनेश रहांगडाले, कृउबास सभापति भाऊराव उके, सुनील केळनका, छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, संजीव कुलकर्णी, जयंत शुक्ला, मनोज मेंढे, नंदूभाऊ बिसेन, अमित झा, सीताताई, रहांगडाले, भावना कदम, चेतालीसिंग नागपुरे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.