तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान रखडले.
दै.ज्योतिर्गमय
संजय गाधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असून लाभार्थी बँकेत जावून अनूदानाची चौकशी करीत असल्याचे,”सर्वत्र दुःखद् चित्र, असल्याचे मत चिमूर तालुका युवक काँग्रेस कार्यकर्ता शुभम विजय गजभिये यांचे आहे.
म्हणूनच त्यांनी रखडलेले अनुदान तात्काळ देण्याची मागणी सार्वजनिक रित्या केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जूलै महिन्यांपासून सुरु झाली असून लाडक्या बहिणीना दर महा मिळणारे अनुदान वेळेवर मिळत असल्यामुळें तीन महिन्यापासून बँके मधील गर्दी कमी होताना दिसत नाही.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना अंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिन्याचे अनुदान मिळाले नसल्यामुळे निराधार महिला-पुरुष महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या धोरणावर कमालीचे नाराज झाले असल्याचे मत शुभंम गजभिये यांचे आहे.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेच्या निधीतून लाभार्थाना देण्यात येणाऱ्या अनुदानात केंद्र शासना कडुन देण्यात येत असलेले अनुदान लाभार्थाना तीन महिन्यापासून मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थी करीत आहेत.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत वेतन अनुदान योजना,इंदिरागांधी विधवा योजना,अंपग योजनाच्या लाभार्थीना दरमहा एक हजार पाचशे रुपये वेतन अनुदान मिळते.
राज्य शासना कडुन राबविण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या विधवांना व अपंगांना दरमहा एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळत आहे.
मात्र केंद्र सरकारच्या
अनुदान गेल्या तीन महिन्यापासून मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थी करीत आहे.याचबरोबर गोरगरीब लाभार्थ्यांना योजनांतर्गत अद्यापही रुपये दिले गेले नसल्यामुळे लाभार्थी त्रस्त झाले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै पासुन सुरु झाली आहे.या लाडक्या बहिणीना तीन महिन्याचे पैसे मिळाले व आक्टोंबर व नोव्हेंबर महिण्याचे पैसे ५ आक्टोंबरला जमा झाले आहेत.
त्यामुळे लाडकी बहिण तुपाशी आणि श्रावण बाळ व विधवा व अपंग मात्र उपाशी अशी परीस्थिती दिसून येत आहे.
श्रावण बाळ योजनांतर्गत विधवा – अपंगांना दिले जाणारे अनुदान वेळेवर मिळावे अशी मागणी लाभार्थ्यांसह शुभंम गजभिये यांनी केली आहे..