शहर प्रतिनिधी
जितेंद्र लाखोटिया, तेल्हारा
प्रबिसी नगर किजे सब काजा। हृदय राखी कौसलपुर राजा।।
अकोला येथील लोक हे संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक वृत्ती आणि भागवतभक्ति साठी प्रसिद्ध असून शिवर येथील मारुती संस्थान द्वारे स्थापित गजानन महाराज मंदिर ची सेवा संस्थान मार्फत ज्या पद्धती ने होते ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक संस्थान याचे शिकवण्या सारखी आहे. गुरुवार आणि एकादशी चे दिवशी तर शिवर येथे भक्तांची गर्दी पाहून असे वाटते की शेगांव येथे आलो आहे. त्यात आणखी भर म्हणजे विराट हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत आहे.दिनांक 13/10/ 24 रोजी अखंड रामायण चे पाठ सुरू झाले असून,दिनांक 14/10/24 रोजी सकाळी 10/00 वाजता संपूर्ण भारतात ज्याचा नाव लौकिक झालेला आणि अकोला शहराच नावलौकिक केला अशा राज राजेश्वर दरबार मंडळाचे संदरकांड कीर्तन स्वरूप मराठी अनुवाद सह किर्तनकार पं. श्याम शर्मा यांचे मार्गदर्शनात संस्थान यांनी आयोजित केले आहे. शिव महापुराण कथे चे आयोजन तसेच विविध कीर्तनकार यांचे कीर्तन प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात संस्थान यांनी आयोजित केले आहे. शुरुवात हनुमंत यांना प्रिय राम कथा व सुंदरकांड पासून कार्यक्रमाची शुरुवात होत आहे.