तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी
योगेश मेहरे
अकोट
अकोट: रात्री अपरात्री रुग्णांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यासाठी सध्या चोहोट्टा बाजार येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेने संबंधित विभागाकडे केली आहे. आजारी महिला, वृद्ध , गर्भवती स्त्रिया यांना प्रसूतीसाठी, तसेच गंभीर आजार असलेले अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेची लाभ घेता यावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. अकोला अकोट मार्गावरील चोहोट्टा बाजार हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या अंतर्गत कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चोहोट्टा बाजार येथे रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. महामार्गावर एक दिवस आड अपघातांची मालिका सुरूच असून अपघात ग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून येथील नागरिक रुग्णवाहिकेपासून वंचित आहेत. दरम्यान, सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोनवरून संपर्क केला तर ती वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागत आहे. अनेकवेळा खाजगी रुग्णवाहिकेने घेऊन जावे लागत असून नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अकोला त्यामुळे अकोट मार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रुग्णवाहिका आवश्यक असून या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी बि वैष्णवी मॅडम व जिल्हा आरोग्य अधिकारी गाढवे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याकडे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विदर्भ युवा पुर्णाजी खोडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्वरित मागणीची अकोल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकानी घेतली दखल. दरम्यान रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी जिल्हा चिकित्सक यांच्याकडे रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत अकोल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य सेवा व अभियानचे संचालक व आयुक्त मुंबई यांच्याकडे चोहोट्टा बाजार येथे एक 108 रुग्णवाहिका देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.अकोट अकोला मार्गावरील
चोहोट्टा बाजार हे मुख्य बाजारपेठ व गजबजलेले ठिकाण असून या परिसरा अंतर्गत ५२ खेडेगाव आहेत. या सर्व खेडेगावांचा भार एकट्या चोहोट्टा बाजारवर आहे. त्यामुळे तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी सध्यातरी ठिकाणी एका रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे….