तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर तालुक्यातील:- जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे 68 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गावातिल मुख्य रस्त्याने महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध,चक्रवर्ती सम्राट अशोक महान,बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. शांतिचा संदेश देत,क्रोधाला प्रेमाने,पापाला सदाचाराने,लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली इतिहास केला. बुद्ध विचारांचे बीज पेरत बुध्दम शरणंम गछामी,धम्मम शरणंम गछामी,संघम शरणंम गछामीचा निनाद, हातात मेणबत्ती घेत जयघोष करत निघाली व विहाराचे प्रांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाला बौद्ध पंच कमेटी अध्यक्ष , ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशिक रामटेके यांनी केले.सामाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,यात तरुणांनी , पुरुषांनी, महिलांनी उल्लेखनीय योगदान केल.याप्रसंगी समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.