▪️ पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांची मागणी
चिमूर प्रतिनिधी
चिमूर:- चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे अन्नपूर्णा गार्डनच्या विकास कामांसाठी व बालउद्यानासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी पन्नास लाखांचा निधी मंजूर करून कामांचे भूमिपूजन १३ ऑक्टोबरला करु असे आश्वासन दिले.परतु तारीख येऊन काही प्रतिसाद मिळत नसल्याने आज १४ ऑक्टोबरला ग्राम पंचायत कार्यालय महादवाडी येथे पत्रकार परिषदेतून सरपंच भोजराज कामडी यांनी आमदार साहेबांनी बोललेल्या शब्दाची वचनपूर्ती करावी अशी मागणी केली आहे.
सरपंच भोजराज कामडी यांनी माहिती देताना सांगितले की आमदार साहेबांनी १३ जुनला महादवाडी येथील जाहीर कार्यक्रमात बालउद्यानाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.१८ जुनला चिमूर येथील आढावा सभेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.त्याच्या सुचनेनुसार इस्टिमेट बनविले.नागभिड, चंद्रपूर, चिमूर येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात चक्करा मारुन सर्व सोपस्कार पार पाडले परंतु अजूनही निधी आला नाही आणि आमदार साहेबांनी बोलल्या प्रमाणे भुमीपूजंन केले नाही.आमची दिशाभूल करु नये.बोले तैसा चाले या वृत्ती प्रमाणे आमदार साहेबांनी आपला शब्द पाळावा.आमदार साहेब गुरुदेवांच्या विचारांवर चालणारे आहेत.बोलतील तसेच करतात असे ते नेहमी आपल्या भाषणात सांगतात.म्हणुण त्यांनी बोलल्या प्रमाणे महादवाडी गावातील अन्नपूर्णा गार्डन विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अन्यथा विधानसभा निवडणुकीत त्यांचें प्रचार वाहन गावात येवू देणार नाही आणि त्यांच्या प्रचार सभेत त्यांना प्रश्न विचारु की माझ्या गावांचा गुन्हा काय ?
आमदार साहेबांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी विनंती वजा मागणी सरपंच भोजराज कामडी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.