तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर :- आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथे ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच, आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात झालेला संपूर्ण चिमूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले.
आमदार भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत आंबोली पंचायत समिती क्षेत्रातील मालेवाडा, जांभूळघाट, पारडपार, पूयारदंड, गडपिपरी व आंबोली या गावांमध्ये विविध ठिकाणी भेट दिली व कॉर्नरसभेत स्थानिक ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. या गाव भेट तथा संवाद दौऱ्याप्रसंगी विविध मंदिर देवस्थान व नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देऊन देवींचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी समस्त ग्रामवासीयांच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.