प्रतिनिधी :ढाणकी
प्रशांत आरेवाड
ढाणकी मध्ये सर्व जातीचे लोक गुण्या गोविंदा ने राहत असताना अघटित दुर्घटनामुळे दूषित वातावरण निर्माण होऊन लोकात भीती निर्माण झाली होती. ही भीती काढण्यासाठी या मिरवणुकीची जबाबदारी बिटरगाव( बु ) चे ठाणेदार संतोष मनवर साहेब यांनी संपूर्णपणे स्विकारून अतिशय चांगल्याप्रकारे निभावून दाखवली.
तसेच आपल्या ढाणकी वर लागलेला काळा ठिपका पुसण्यासाठी ढाणकीतील सर्व दुर्गा उत्सव मंडळाने संपूर्ण पणे जिम्मेवारी ने व जबाबदारी स्वीकारून पोलिस प्रशासनाच्या दिलेल्या सुचना प्रमाणे मिरवणूक पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले आणि गावातील सगळ्या जातीतील जबाबदार नागरिकांनी सुद्धा हि मिरवणूक पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली.या मिरवणूकीला कसल्याही प्रकारची विकृतीचे ग्रहण लागू नये यासाठी ढाणकी शहरातील बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री संतोष मनवर साहेब यांनी अतिशय उत्तम बंदोबस्त तैनात केला होता.
तसेच यवतमाळ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते साहेब यांनी सुद्धा आपल्या संपूर्ण टीम सह सकाळपासून ते रात्री विसर्जन होई पर्यंत अन्न आणि पाणी चा त्याग करून ढाणकी शहरात ठाण मांडून बसले आणि आपले कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडले .
या मिरवणुकीच्या वेळी पोलिस मित्र मंडळाने अतिशय जिम्मेवारी ने ठाणेदार साहेबानी दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून अतिशय उत्तम पद्धतीने बंदोबस्त तैनात ठेवून सहकार्य केले.तसेच महसूल विभाग व नगरपंचायत चे अधिकारी महावितरण चे कर्मचारी सुद्धा या मिरवणूकीच्या वेळी दिवसभर विसर्जन होई पर्यंत उपस्थित होते.
दुर्गा विसर्जित केल्या नंतर बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री संतोष मनवर साहेब तसेच यवतमाळ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री ज्ञानोबा देवकते साहेब आणि समस्त पोलिस कर्मचारी व पोलीस मित्र मंडळींचे गावकर्यांनी पोलिस प्रशासनाच्या केलेल्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.
चौकट :
ढाणकी गावातील सर्व जातीधर्माचे लोक खूपच चांगले आहेत एवढया मोठया गावात दोन चार विघ्न संतोषी असतात त्यांना सरळ करण्यासाठी प्रशासन व गावकरी यांनी मिळुन काम करायचे आहे
गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक
ज्ञानोबा देवकतेसाहेब यवतमाळ,