तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर :- ‘सर्वांसाठी आरोग्य” हे उद्दिष्ट ठेवुन ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शासनाने स्विकारली असुन त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधक, उपचारात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविनेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे ग्रामीण भागात उभे केले.ग्रामीण जनतेला जनतेला आरोग्य विषयक सुविधां पोहचविण्यासाठी खेड्यापाड्यात उपकेंद्राची स्थापन करण्यात आली.लाखो रुपये खर्च करून इमारती बांधल्या परंतु आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य सेविका नसल्याने अडेगाव (देश) येथील आरोग्य उपकेंद्राची वास्तू शोभेची झाली आहे.आरोग्याचा विषय गंभीर असताना कुणाचेच लक्ष नाही.
चिमूर तालुक्यातील मासळ आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या अडेगाव उपकेंद्रात आरोग्य सेविका नसल्याने अडेगाव वाशीयाना आरोग्य विषयक सुविधां मिळत नसुन पावसाळ्याच्या दिवसात गॅस्ट्रो, हिवताप इतर सातीच्या रोगाचा गावकऱ्यांना सामना करावा लागतो उपचारासाठी साठी रातविकार बाहेर गावी जावे लागते.गरोदर मातेलाही आरोग्य सेविका नसल्याने त्रास भोगावा लागतो याकडे प्रशासनाने, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होते आहे.अडेगावला प्रशासनाने लक्ष देऊन आरोग्य सेविका द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लटारु सुर्यवंशी आणि अडेगाव वाशीयानी केली आहे.