खासदार नागेश पाटील आष्टीकर या कडे लक्ष देतील काय?
प्रतिनिधी ढाणकी / प्रशांत आरेवाड
निवडणूका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना हदगाव हिमायतनगर तालुक्यात करोडो रुपयांची कामे तातडीने मंजूर करून भुमीपुजन करण्यात येत आहेत परंतु डोल्हारी ते पैनगंगा नदी गांजेगाव पुलापर्यन्तचा 2.5 कि. मी रस्त्याचीअनेक वेळा मागणी करुन सुद्धा कोणत्याही नेत्याने लक्ष दिले नाही. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी गांजेगाव येथे पंतप्रधान सडक योजना ढाणकी ते गांजेगाव पुला पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन करून चार वर्षे लोटली पण गांजेगाव नदी पुलासाठी पंचविस कोटी रुपये मंजूर करून देतो असे गांजेगाव येथील सभेत जाहीर केले परंतु काय झाले माहित नाही पण गांजेगाव पुलाचे काम सोडून पैनगंगा नदी वर अनेक पुल मंजूर करून काम सुरू झाले. पण गांजेगाव पुलाचे कामाचे कुठे घोडे अडले आहे की, जो आजपर्यंत पुल झाला नाही. हदगाव हिमायतनगर तालुक्यात हेमंत पाटील यांच्या सहकार्याने वारसा चालवत असणारे विकासाचे महा मेरु बाबुराव कदम कोहळीकर कोणत्याही पदावर नसताना हिमायतनगर हदगाव तालुक्यात 95कोटी रुपयाचे कामाचे निधी आणून 14आक्टोबरला भूमिपूजन करतात पण डोल्हारी ते पैनगंगा नदी गांजेगाव पुलापर्यन्त 2.5 कि.मी रस्त्याचे कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करता आले नाही. जनता यांना सुद्धा मागणी करुन डोल्हारी ते गांजेगाव नदी पुलांपर्यंतचा रस्ता असलेला हिमायतनगर तालुक्यातुन विदर्भ मराठवाडा यांना जोडणारा रस्ता आहे.या 2.5 की मी रस्त्याला वंचित ठेवल्याने या भागातील लोक दळण वळण विकासा पासून वंचित रहात असल्यामुळे पळसपुर,डोल्हारी,सीरपली, गांजेगाव व ढाणकी येथील नागरिक नाराज असून या साठी खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब या कडे लक्ष देतील काय? असे प्रश्न नागरिक करत आहे.