तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्याचे मन बनवले असल्याने, यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदार विजयी करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ.सतीश वारजूकर हे विधानसभेचे मैदान जिंकणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नेतृत्व करणारा व्यक्ती रुपयात रुढ होण्यापेक्षा जनतेच्या उन्नतीत,स्वाभिमानात आणि सन्मानात व हक्कात रुढ झाला पाहिजे.
मात्र मागील १० वर्षाच्या कार्यकाळात सत्ताधारी आमदारांच्या क्षेत्रात मुरुम,रेती,माती खनिज संपदातंर्गत लयलूट झाली असून,” चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे करोडो रुपये,नातेवाईक कंपनीधारकाच्या घशात घातले आहेत.
याचबरोबर राष्ट्रीय माहामार्गाचे व राज्य महामार्गाचे कामे करताना बऱ्याच ठिकाणाहून बिना रायलटी मुरुम व मातीचा सर्रास वापर रास्ता बांधकामात करून तेथूनही खरबो रुपयांचे गभण झाले असल्याचे वास्तव आहे.
तद्वतच ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक व्हिजेंटी-एन्टी समाज घटकावर केंद्र व राज्य शासनाद्वारे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष अन्याय होत असताना चूप बसणारे किर्तीकुमार भांगडीया सारखे आमदार चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत नागरिकांना नको आहेत.
रुपयांपेक्षा हक्क व अधिकार महत्वाचे आहेत हे नागरिकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे.विकास निधी बरोबर नागरिकांच्या अधिकार-हक्कांसाठी विधानसभेत व मैदानात आवाज उठविणारा आमदार चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना हवा आहे.
डॉ सतीश वारजूकरांनी गोरगरीब जनतेला मदत केली आणि करीत राहणार आहेत.याचबरोबर ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी समाज घटकातील नागरिकांवर व विद्यार्थ्यांवर शासनातर्फे निर्णयान्वये अन्याय केला जात असतांना डॉ.सतीश वारजूकरांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून अन्यायकारक निर्णयाचा तिव्र विरोध केला आणि महाराष्ट्र शासनापर्यंत जनतेच्या गंभीर समस्याला पोहोचले आणि जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या विरोधातले शासन निर्णय अमान्य असल्याचे ठणकावून सांगितले होते.
लोकांच्या समस्या शासनदरबारी पोहचविणारा व सर्व नागरिकांच्या अधिकार हक्कांसाठी लढा देणारा आमदार चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना हवा आहे.
म्हणूनच डॉ.सतीश वारजूकर यांच्याकडे चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.गोपनिय माहितीच्या आधारे डॉ.सतीश वारजूकर हे ३० ते ४० हजार मतांच्या लिडने जिंकतील,असे लोकसर्वे सांगतो आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत बऱ्याच रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली.कामे कुणी केलीत हे महत्त्वाचे नसून कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली हा गंभीर विषय आहे.निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामांकडे स्थानिक आमदारांचे दुर्लक्ष का म्हणून झाले?हा मुद्दा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी भयंकर वेदनादायक ठरलाय.
निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारणाऱ्यांचे मतदार अजिबात ऐकणार नाही असी खमंग चर्चा मतदारातच आहे.
आता मतदार सतर्क झाले असून बळीचे बकरे ते ठरणार नाही असे त्यांचेच म्हणणे आहे.