ऊसतोड कामगार परिवाराचा सतीश घाटगे यांच्याकडून सपत्नीक सन्मान.. जिल्यात पहिल्यांदा झाला ऊसतोड कामगार परिवाराचा सन्मान सोहळा
बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
घनसावंगी: अंबड, जालना व घनसावंगी तालुक्यातील शेकडो उसतोड कामगारांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या कष्टाप्रती समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व संचालिका सौ. वैशालीताई घाटगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. घनसावंगी शहरातील नृसिंह मंगल कार्यालयात ऊसतोड कामगारांचा हा सन्मान व कृतज्ञता सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. उसतोड कामगारांसाठी असा सोहळा जिल्ह्यात पहिल्यांदा राबवण्यात आला.
उसतोडी करणारे कामगारांचे हात ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्याचा खरा कणा आहे. हे कामगार त्यांच्या कुटुंबासाठी खरे हिरो आहेत. या गरीब घटकांचे सामाजिक बाधीलकी म्हणून आम्ही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील उसतोड कामगार मोठ्या संख्यने सहपरिवार उपस्थित होते. त्यांचा सतीश घाटगे व सौ. वैशालीताई घाटगे यांनी सपत्नीक सत्कार केला. महिला भगिनींना साडी व पुरुषांना टॉवेल- टोपी भेट देऊन त्यांचा सन्मान केला, त्यांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कामगारांच्या प्रत्येक अडचणीत समृद्धी साखर कारखाना उभा असेल, असा विश्वास यावेळी सतीश घाटगे यांनी कामगारांना दिला. या कार्यक्रमास गोविंद आर्दड, पांडुरंग नाना भांगे, हरीश राठोड, शिवाजीराव कंटूले, रामेश्वर माने, बाबासाहेब हरबक, गणेश खरात यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्यांदा झालेल्या सन्मानाने उसतोड कामगार भारावले
उसतोड कामगाराकडे फक्त कामगार म्हणून पाहिलं जात. परंतु सतीश घाटगे यांनी केलेल्या सन्मान सोहळ्यात केलेल्या सत्काराबद्दल प्रत्येक कामगार भारावून गेला. असा मान सन्मान आमचा कधी झाला नाही. माणूस म्हणून आम्हाला मिळालेला हा सन्मान आम्ही कधी विसरणार नाही. अशा शब्दात उसतोड महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत समृद्धी कारखान्याचे आभार मानले.
प्रतिक्रिया
उन, वारा, वादळ आणि कडाक्याच्या थंडीत काम करणाऱ्या या कष्टकरी हातामुळे उस उत्पादक शेतकरी आणि समृद्धी साखर कारखाना कष्टकरी गरिबांच्या जीवनात समृद्धी आणत आहे. या कामगारांचे आम्ही देणे लागतो या भावनेतून सर्व उसतोड कामगारांचा सन्मान केला. त्यांच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी शास्वत प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न समृद्धी कारखाना करणार आहे.
सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी शुगर्स