पक्षाला नारळ देण्याची इच्छा पण पाटील ठाम
योगेश मेहरे
अकोट
अकोट मधून यावेळी भाजपला भाकरी फिरवायची आहे मात्र आमदार प्रकाश भारसाकळे अकोटवर ठाम आहेत त्यामुळे भाजप जालीम उपाय करण्याच्या तयारीत असल्याने भारसाकळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत.भाजपने केलेल्या अजवरील तीन सर्व्हेत भारसाकळे याना बदलण्याची गरज असल्याचे वास्तव पुढे आले आहे, त्यानुसार पक्षाने भूमिका घ्यावी यासाठी वरिष्ठ नेत्यांनी होकार दिला
आहे मात्र प्रकाश पाटील अकोटवरील आपला हट्ट सोडायला तयार नाहीत म्हणून आता पक्ष्याने मोठी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अकोट मतदार संघात येत्या दोन
तीन दिवसात उमेदवारीच्या दृष्टीने जोरदार घडामोडी घडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात धोत्रे सावरकर गटाने डॉ. रणजित सपकाळ यांचे नाव लावून धरले असताना संघ परिवार आणि पक्षाने केलेल्या सर्व्हेत पक्षांबाहेरील व्यक्तीच्या नावाला पसंती दिल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रकाश भारसाकळे यांना यावेळी उमेदवारी दिल्यास महायुतीला फटका बसू शकतो असे सर्व अहवाल सांगत असल्यामुळे अकोटात भाकर फिरवावी यावर भाजप ठाम दिसत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.