तालुका प्रतिनिधी
मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):-
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार. १५ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१९च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.
आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला.
निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २२ ऑक्टोंबर २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २९ नोव्हेंबर २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी – ३० नोव्हेंबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ४ नोव्हेंबर २०२४
मतदान – २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी – २३ नोव्हेंबर २०२४