चिमूर प्रतिनिधी
चिमूर :- चिमूर शहरातील मुख्य रस्त्यावर म्हणजेच ३५३ ई या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रेतीसाठा दिसून येतो, महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र चिमूर तालुक्यात दिसत आहे. रेती तस्करी जोमात मात्र महसूल अधिकारी व पोलिस प्रशासन कोमात असे नागरिक चौकाचौकात बोलताना दिसत आहे. रोज रात्रीच्या अंधारात रेती (चोरी चे) तस्करीचे काम सुरू असते. ट्रॅक्टरच्या र्ककश आवाजाने नागरिकांची झोप उडाली असून याबाबत अनेकदा निवेदनाद्वारे तक्रार सुद्धा देण्यात आली आहे मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई अजूनही झाल्याची दिसून येत नाही. आतातर आचारसंहितेचे सुद्धा उल्लंघन होतांना दिसत आहे. रेती भरून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या र्ककश आवाज पोलीस व महसुल प्रशासनाच्या कानाला पोहचत नाही का ? अशी चर्चा नागरिक करीत आहेत.