लोणार प्रतिनिधी
उबेद कुरेशी
लोणार डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस समाज उपयोगी विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला
महाविकास आघाडीच्या माध्यमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोपाल बछीरे यांच्या वाढदिवसानिमित्त, गोशाळेमध्ये गाईंना चारा वैरण देण्यात आले, वैदु गोंड पारधी महिला भगिनी यांना साड्यांचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपण्यात आली, गरजवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हे उपक्रम दिवसभर चालले व सायंकाळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांचे नेते कार्यकर्ते व डॉ. बछिरे यांच्यावर प्रेम करणारे आप्त इष्ट लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे शैलेश सावजी, कलीम खान, नंदकुमार गोरे, देवानंद पवार, भूषणभाऊ मापारी, ज्ञानेश्वर चिभडे मामा, केशवराव फुके, शांतीलाल गोगलिया, अमोल सोनवणे, तोफिक कुरेशी, विकास मोरे, राष्ट्रवादीचे सदानंद पाटील तेजनकर, इब्राहिम शेख, दत्ता पाटील घनमट, विजय मोरे, वाजेद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदू कराडे, नारायण बळी, किसन पाटील, लिंबाजी पांडव, किशोरभाऊ गारोळे, संदीप गारोळे, ऍड दीपक मापारी, गजानन जाधव, परमेश्वर दहातोंडे, लुकमान कुरेशी, इक्बाल कुरेशी, सय्यद उमर, श्रीकांत मादनकर, गणेश सवडतकर, यांच्यासह मोठ्या संख्येने शुभेच्छा देणारे व डॉ. बछिरे यांच्यावर प्रेम करणारे शुभेच्छा देणारे उपस्थित होते.