डॉ विनायक गायकवाड
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर : सासवड पोलीस स्टेशन येथे ऋषिकेश अधिकारी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
या वेळी मार्गदर्शन करताना साहेबांनी सांगितले कि विधानसभा सार्वत्रिक 2024 निवडणूक ही एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे.पोलीस पाटील यांनी सतर्क राहून वेळोवेळी सर्व गोष्टी वर बारीक लक्स ठेवणे गरजेचे आहे.
उमेदवारांच्या रॅली ची वेळ वेगवेगळी असावी, तसेच दोन्ही उमेदवारांच्या सभेची वेळ वेगवेगळी असेल, सभेचे स्टेज समोरासमोर असू नये, या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल आणू नये,येताना ओळखपत्र बरोबर असावे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हे मतदारासोबत असणे गरजेचे आहे, तसेच मतदान केंद्रापासून 100 मीटर च्या पुढे वाहने पार्क करावी या सर्व गोष्टीबद्दल मतदारांमध्ये जागृती करावी,जेणेकरून निवडणुकीच्या दिवशी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही,या सर्व गोष्टीबद्दल ऋषिकेश अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले, यावेळी विविध गावचे पोलीस पाटील हजर होते. मीटिंगचे आयोजन गोपनीयचे रुपेश भगत साहेब यांनी ऋषिकेश अधिकारी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.