प्रति. मधूकर सडमेक अहेरी
अहेरी वृत १८५७ चे राष्ट्रीय शहीद विर बाबूराव सडमेक यांनी ब्रिटीश सरकारच्या जूलमी हूकूमशाही ला नेस्नाभूत करण्याचे महान कार्य करणा-या आदिवासी जननायक विर बाबूराव पूलेश्वर शेडमाके यांचे शहीद दिन गडचिरोली जिल्हातील प्रत्येक गावा गावात मोठ्या थाटा माटात साजरे करण्यात आले.ज्यानी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या रक्ताचे एक एक थेंबाची आहूती १८५७ च्या लढ्यात देणारे अवघ्या २५ वर्षात केलेले कार्य हे आजच्या यूवकांसाठी एक प्रेरणा आहे . एकट्या व्यक्तीने हे सार करावे कोणाचे वरदस्त नसताना ब्रिटीश साम्राज्या सोबत लढाई करणे असे कार्य हे एक महान अवतारी पूरूष करू शकतो.छोट्याशा गावात यांचे जन्म झाले १२मार्च१८३३ मध्ये घोट जवळील किष्टापूर ( मोलम्मपल्ली) या गावात जमिनदारी साम्राज्य संप्पन घरात जन्मलेला ब्रिटीश गॅजेट व नकाशा नूसार आज ही त्याचे अवशेष पूरावा म्हणून साक्षी आहेत. प्रतिभावान व्यक्तीमत्व देखना, कूशाग्रबूद्धी संपूर्ण शक्ती, यूक्ती मातेच्या पोटातूनच जनू शिकून आलेला विर बाबूराव यांचे वडीलांचे नाव पूलेश्वर व माता जूरजाकूंवर अदिलाबाद साम्राज्याची राजकूमारी यांच्या पोटातून जन्मलेला शूक्ल पोर्णिमा च्या दिवसी जन्मलेला. योध्दाने रायपूर येथील ख्रिश्नन मिशनरी द्वारे चालविण्यात येणा-या शिक्षण विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेत असताना आपल्या लोंकावर होत असलेले अन्याय अत्याचार त्यांना सहन झाले नाही. शेवटी आपल्या गावी परत येवून ब्रिटीश सरकारा विरूद्ध बंड पूकारला हातात त्यांनी तलवार घेवून देशाच्या स्वातंत्र करता लढाई पूकारली कित्येक ब्रिटीश लोंकाना एकट्या व्यक्ती ने यमसदनी पाठविले. त्यांचे कार्याची प्रसिद्धी हळू हळू संपूर्ण परिसरात हवा सारखे पसरली गावा गावात जावून तरूणांची जंगोम सेना बनविले व कित्येक लढाई स्वताह जंगोम सेना सोबत घेवून गोंडपिपरी जवळील जूनासूर्ला ची लढाईत हजारो ब्रिटीशांना यमसदनी पोंहचवले. तिथेच न थांबता अहेरी येथील टेलीफोन छावणीवर हल्ला चढवून गार्डलॅन्ड व हॉल या दोन सेनापतीना जागीच ठार केले ही बातमी लगेच दिल्ली येथे राणी व्हिक्टोरीया यांना कळताच तिच्या पाया खालीची जमिन सरकली एक व्यक्ती हे सारा करीत आहे ही गोष्ट सामान्य गोष्ट नाही. त्याला पकडण्यासाठी कित्येक मोठ मोठे सरसेनापती आले पंरतू त्याला पकडू शकले नाही. कारण तो सामान्य व्यक्ती नव्हता वर्जनीका ( थाडवा) प्राशन केलेले व्यक्ती साधारण नसते हे गोष्ट ब्रिटीशाने कळले शेवटी कट कारस्थान रचून त्याला पकडण्यात आले व २१ आक्टोंबर १८५७ ला चांदा (चंन्द्रपूर) येथील पिंपळाच्या झाडाला पाशी देवून महान हूतात्म्याला संपवून ठाकले आज ही ते पिंपळाचे झाड साक्षी म्हणून साभूत आहे. आज ही शहीद स्वांतत्र वीर प्रत्येक आदिवासी समाज नाही तर प्रत्येक देशवासींच्या हृद्यात राहील. जब तक सूरज चांद रहेंगा विर बाबूराव शेडमाके जननायक अमर रहेंगा.