पत्रकार परिषदेत वारसांचा आरोप
तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर तालुक्यातील:- दाबका हेटी येथील शेतजमिन हरी पराते, हुमा पराते व बापुना पराते यांनी १९६० साली खरेदी केली होती.याशेतीचे १९६५ मध्ये आपसी हिस्से करण्यात आले.मात्र माझाच हिस्सा असल्याचे सांगुन प्रशासनाशी संगनमत करून चुलत बहिणीच्या मुलाने आपले नाव चढवुन यातील खऱ्या वारसांना बेदखल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.
चवसष्ठ वर्षापुर्वी वडील व त्यांच्या भावांनी घेतलेल्या शेतजमीनी करीता शासण प्रशासणाचे उंबरठ्यावर खेटा झिजवलणारे मुळ वस्ती दाबका हेटी हल्ली मुक्काम चंद्रपूर देवराव बापुना पराते तथा दाबका हेटी येथील वामन उमाजी पराते यांनी चिमूर येथे पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत त्यांना रंगनाथ नंदनवार भिसी यांनी त्यांच्या आईच्या वारसान हक्काने मिळालेल्या शेतजमीनी सोबतच देवराव पराते व वामन पराते यांना वारसान हक्काने मिळणाऱ्या शेतजमीनवर तलाठी,तहसीलदार यांच्या संगणमताने खोटी माहिती देऊन अतिक्रमण करून पिक घेत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात विभागीय आयुक्ताकडे असताना त्यांनी देवराव यांच्या बाजुने निकाल देत प्रकरण पुन्हा चिमूर तहसीलदार यांचेकडे २००३ मध्ये चौकशी करीता दिला असे पत्रकार परिषदेत सांगितले.
आयुक्ताच्या आदेशाला फिरवुन तत्कालीन तहसीलदारांनी रंगनाथ नंदनवार यांचे बाजुने निर्णय दिला होता.हा खऱ्या वारसानावर अन्यायच होता.मात्र आमच्या कडे असलेला असलेला १९६० चा पुरावा ग्राह्य धरला नाही.त्यामुळे या प्रकरणाची सखोल फेर तपासणी तथा पुराव्यांची शहनिशा करून आम्हाला वारसान हक्काने मिळणारे हक्क मिळवुन देण्याची मागणी देवराव पराते व वामन पराते यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन केली .