जोरदार शक्तिप्रदर्शन
तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर-७४, विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी नेहरू विद्यालय चिमूर ते प्रशासकीय भवन (तहसील कार्यालय, चिमूर) पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, माजी आमदार मितेश भांगडीया, वसंत वारजुरकर, दिलीप शिवरकर, श्रीकांत भांगडीया,राजु देवतळे, जितेंद्र मोटघरे महायुतीचे नेते व मोठ्या संख्येनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.