माधव देवसरकर, दिलीप राठोड आणि माधवराव पाटील यांना उमेदवारी
कृष्णा चौतमाल
हदगाव – हदगाव विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होत असुन हदगाव विधानसभेसाठी स्वराज्य पक्ष वंचित बहूजन आघाडी आणि महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार घोषित केले आहेत. तिस-या महाआघाडीतील स्वराज्य पक्षाकडून हदगावची उमेदवारी माधवराव पाटील देवसरकर यांना देण्यात आली आहे. वंचित बहूजन आघाडीकडून दिलीप राठोड यांना उमेदवारी देण्यात आहे. महाविकास आघाडीकडून कॉग्रेसचे माधवराव पवार यांना उमेदवारी घोषित झाली आहे. परंतु महायुतीतील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाकडून कोणताही उमेदवार घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे महायुतीकडून हदगाव विधानसभेसाठी कोणता उमेदवार दिला जाणार याकडे हदगावातील नागरीकांचे लक्ष लागून आहे. सद्याच्या स्थिातीवरून हद गाव विधानसभाकरीता चौरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीकडुन शिवसेना शिंदे गट व भाजपा मध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होताना दिसून येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडाणुकी मध्ये अपक्ष म्हणुन बाबुरावजी कदम यांनी निवडणुक लढवत दुस-या क्रमाकाची मते प्राप्त केली होती. त्यामुळे महायुतीकडून शिवसेनेला उमेदवारी मिळणार कि भाजपा उमेदवारी मिळणार हे येणा-या दिवसात दिसून येणार
आहे.