आरोग्य सेविका नसल्याने वडसी,गोंदेडा,खातोडा केवाडा,पेट या गावातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधां मिळत नाही
तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर :- ‘सर्वांसाठी आरोग्य” हे उद्दिष्ट ठेवुन ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शासनाने स्विकारली असुन त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधक, उपचारात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविनेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे ग्रामीण भागात उभे केले.ग्रामीण जनतेला जनतेला आरोग्य विषयक सुविधां पोहचविण्यासाठी खेड्यापाड्यात उपकेंद्राची स्थापन करण्यात आली.लाखो रुपये खर्च करून इमारती बांधल्या परंतु आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य सेविका नसल्याने वडसी येथील आरोग्य उपकेंद्राची वास्तू शोभेची झाली असून आरोग्य सेविका विना पोरके झाले आहे.
.
आरोग्याचा विषय गंभीर असताना कुणाचेच लक्ष नाही.
चिमूर तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्यां वडसी उपकेंद्रात आरोग्य सेविका नसल्याने वडसी,गोंदेडा ,खातोडा,केवाडा,पेट या गावातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधां मिळत नसुन वातावरणातील बदलामुळे सातीच्या रोगाचा गावकऱ्यांना सामना करावा लागतो उपचारासाठी रात्रविकार बाहेर गावी जावे लागते.गरोदर मातेलाही आरोग्य सेविका नसल्याने त्रास भोगावा लागतो याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे .
वडसी येथील आरोग्य उपकेंद्राला प्रशासनाने लक्ष देऊन आरोग्य सेविका द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.