तालुका प्रतिनिधी
एस पी दळवी / उमरखेड
उमरखेड शहरात मागील काही दिवसात नव्याने रुजु झालेले उपमाहिती अधिकारी यांनी पत्रकार संघटने मध्ये दुफळी निर्माण करून दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा या म्हणी प्रमाणे आपल्या पॉकीट चे वजन वाढावे म्हणून अधिकृत म्हणून घोषीत करणाऱ्या पत्रकारा मध्ये असे किती पत्रकार आहेत की त्यानी पत्रकारीते साठी लागणारे शिक्षण पूर्ण केले आहे. खरच त्यांचे जवळ ते अधिकृत पत्रकार असल्याचे लागणारे कागद पत्र पूर्ण आहेत का? समाजात वावरताना पत्रकाराची प्रतिष्ठा जपतात का ? खरच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतात का ? की राजकीय पुढार्यांच्या पुढे पुढे गोंडा घोळून त्यांच्या वती भवती मिरवुन आपकी आर्थिक पोळी भाजून घेतात
एकमेकाला कमी लेखुन आपले वजन वाढेल व येणाच्या दिवाळी मध्ये आपल्या पॉकीट मध्ये भर पडणार या भ्रमांत असणाऱ्या पत्रकाराचा मुखवटा उतरणार जे उपमाहिती अधिकारी व काही दैनिक वृत्तपत्राच्या पत्रकारानी अनाधिकृत म्हणून घोषीत केलेल्या वृत्तपत्राचे पेपरला, साप्ताहिक पेपरला बंद करून ते अनधिकृत असल्याचे सिध्द करतील का? आम्ही म्हणतो हे अनाधिकृत आहे तर बंद करून दाखवा जर सिध्द न करु शकल्यास आमची समाजा मध्ये प्रतिष्ठा मलीन करण्याचे काम का बरे करता?