- “जात -धर्म, गरीब -श्रीमंत आदी भेद बाजूला ठेवत मानवतेचा दीप लावून ‘सलोख्याची दिवाळी’ साजरी करूया. -डॉ. बी. व्ही. मुंजाळ.
तालुका प्रतिनिधी
एस पी दळवी / उमरखेड
उमरखेड : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सकारात्मक प्रभाव पडावा, उपक्रमातील अनुभव जीवनामध्ये कामी यावा या उद्देशाने उमरखेड येथील संस्कार पोदार लर्न स्कूलच्या प्रांगणात प्रतिकात्मक रूपात दिवाळी साजरी करण्यात आली. त्यावेळी मंचावर शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक डॉ. बी. व्ही.मुंजाळ प्रशासकीय अधिकारी अतीश दिघेवार, समन्वयक निखिल तुकदेव, ज्योती सुंदर, भाग्यश्री मीटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
“जात -धर्म, गरीब -श्रीमंत आदी भेद बाजूला ठेवत मानवतेचा दीप लावून ‘सलोख्याची दिवाळी’ साजरी करूया”, असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी. व्ही. मुंजाळ यांनी केले. “मनातील अंधकार दुर करून आपण आपले जीवन प्रकाशमय करून समाजात आदर्श निर्माण करावा.” असे मत दिनकर कदम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शारदा जाधव यांनी गायलेल्या सरस्वती वंदनाने वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर विद्यार्थांनी आपल्या जादुई सुरांनी मंत्रमुग्ध केले व दमदार नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतः विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध आकाश कंदील संपूर्ण शाळेत लटकवलेले होते.
सोबतच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘आनंद मेळाव्याचे’ देखील आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे संचालक राजेश देशमुख, अजय क्षिरसागर, निशांत बयास, धिरज बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
शाळेत आनंदात दिवाळी साजरी होऊन आता सुट्ट्या राहणार याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.