जिल्हा प्रतिनिधी
अवधूत खडककर / यवतमाळ
उमरखेड : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दि २० नोव्हेबर ला महाराष्ट्र विधानसभा चे मतदान होणार आहे . या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी समाविष्ट होण्यासाठी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोफाळी तालुका उमरखेड च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षिका सह मतदान जनजागृती रॅली गावातून काढून गावातील लोकांना मतदानाविषयी जनजागृती केली . मतदान हा आपला हक्क असून तो हक्क आपण बजवणे आवश्यक आहे असे घोषणा दिल्या यावेळी वर्ग ५ ते १२ च्या सर्वच विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅलीमध्ये सहभाग घेऊन मतदान हे किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापक शेख महमूद शेख विजान, रवि शिलार, प्रा . अवधुतराव देवरुरकर, सुरेश सुरोशे, प्रकाश सुर्यवंशी, टि. सि. चव्हान, आसोले मॅडम, सह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते..