जिल्हा प्रतिनिधि
प्रशांत बाफना / अहमदनगर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये पगार सुरू करून एक अफलातून भेट दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आनंदाच्या डोहात नाचत असतानाच दुसरीकडे रस्त्यावर पोटाच्या आगीसाठी नाचून भिक मागावी लागणाऱ्या तृतीयपंथीयांना देखील या लाडक्या बहिणी योजनेत सहभागी करून घेण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मुंबईत प्रत्यक्ष भेटून आणि बीड येथे संवाद यात्रे दरम्यान आल्यानंतर त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत भैय्या शिंदे यांच्याकडे आश्रय सेवा केंद्राच्या वतीने केली होती. या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथीयांना देखील लाडक्या बहीण योजनेत सरकारने सामावून घेतल्याबद्दल आश्रय सेवा केंद्राच्या वतीने अध्यक्ष शेख आयेशा यांनी सरकारचे विशेष आभार मानले आहेत.
तृतीयपंथीयांचे जगणे अतिशय अवघड आहे. समाज कायम हेटाळणी करतो. कोणी हाताला काम देत नाही. त्यामुळे भीक मागून पोटाची आग शमवावी लागते. कायम अपमानास्पद जगावे लागते. महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार तृतीयपंथीयांसाठी कसल्याही सुविधा देत नाहीत.किमान लाडकी बहीण योजनेत तरी महाराष्ट्रातल्या सर्व तृतीय पंथीयांना सामावून घ्यावे आणि त्यांना योजना लागू करावी. ज्या ज्या योजना महिलांना आहेत त्या सर्व योजना तृतीय पंथीयांना देखील देण्यात याव्यात अशा केलेल्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शासन निर्णयात बदल करून तृतीय पंथीयांना देखील या योजनेत सहभागी करून घेतले आणि या योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देखील सुरू झाला आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आश्रय सेवा केंद्राच्या वतीने विशेष आभार अध्यक्षा शेख आयेशा यांनी मानले आहेत.
चौकट…
राज्यातल्या तृतीयपंथीयांकडून शेख आयेशा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव महिलांप्रमाणेच राज्यातील सर्व तृतीयपंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा त्याचबरोबर ज्या ज्या योजना महिलांसाठी लागू आहेत त्या सर्व योजना तृतीयपंथीयांना देखील देण्यात याव्यात. या मागणी पैकी लाडकी बहिण योजनेत सहभागी करून घेण्याची मागणी मान्य केल्याबद्दल आणि यामुळे राज्यातल्या तृतीय पंथीयांना सरकारकडून पहिल्यांदा मिळालेला सन्मान हा केवळ आश्रय सेवा केंद्राचे अध्यक्ष शेख आयेशा यांच्यामुळे मिळाल्याबद्दल राज्यातील तृतीय पंथियांकडून शेख आयेशा यांचे विशेष अभिनंदन होत आहे.