जिल्हा प्रतिनिधि
प्रशांत बाफना / अहमदनगर
दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊ ठेपली आहे. विद्यूत वस्तूंसह कपडे, वाहने व गृहपयोगी वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती विक्रेत्यांकडून ठेवण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीवर धमाका ऑफर सुरु असल्याने त्याठिकाणी ग्राहकांची अधिक होत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
दिवाळीच्या प्रकाशोत्सवाला (दि. १५) पासून सुरुवात होत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून खरेदीला उधाण आले आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. दिवाळीत गोड पदार्थांसह फराळाचा आस्वाद ग्राहकांना घेता यावा यासाठी अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षित पाकीटमध्ये या वस्तू खरेदीसाठी ठेवल्याने त्या खरेदीचा कलही वाढत असल्याचे दिसून येत आहे.
फराळाबरोबर मिठाई खरेदीसाठी स्वीट मार्टमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. यंदा काजूकतली, रिअल फ्रूट बरोबरच शुगर फ्री मिठाईलाही मागणी आहे. मिक्स मिठाई, काजू कमल भोग, शुगर-फ्री प्रकारची नवीन मिठाई उपलब्ध झाल्या आहेत. तसेच बाजारात फराळाचे तयार पदार्थ उपलब्ध असल्याने
फटाके खरेदीला प्रतिसाद”
येत्या २८ ऑक्टोबर दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे. पाच दिवस दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असते. तसेच या सणानिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. ग्राहकांची देखील विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी बाजारात फटाक्यांची दुकानं पाहायला मिळत आहे. यावर्षी फटाक्यांच्या किंमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी नागरिकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.
त्याकडेही ग्राहकांचा कल दिसत आहे.