कृष्णा चौतमाल
हदगांव : नांदेड दक्षिण मतदार संघामधून शिवसेनेच्या शिंदे गटातुन आनंदराव पाटील बोढारकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून हदगाव मतदार संघामधून बाबुराव पाटील कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदर घोषणा रविवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.
नांदेड दक्षिण व हदगाव मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवारीचा तिडा गेल्या अनेक दिवसापासून कायम होता राज्यातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा झाली होती मात्र या दोन मतदारसंघातील उमेदवारीसाठी अनेक कार्यकत्यांनी रस्सीखेच केली होती मात्र अखेर रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड दक्षिण मतदार संघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बोढारकर तर हदगाव मधून कोहळीकरांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाले आहे रविवारी रात्री सदर घोषणा झाली. असून दोन्ही मतदारसंघांमध्ये कार्यकत्यांनी फटाके फोडून मिठाईवाटून आनंद व्यक्त केला आहे.