तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर :- तालुक्यातील वडसी परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून जिओ कंपनीच्या सिमकार्ड धारकांना नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे गावात टाॅवर असुनही नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारक हैराण झाले आहेत.
आधी ग्राहक आयडिया, ओडाफोनचे सिमकार्ड वापरत होते नेटवर्क मिळत नसल्याने जिओ मध्ये पोर्ट केले होते. मात्र आता जिओ सिम वापरताना देखील याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मोठी नामुष्की मोबाईल धारकांवर आली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, याचप्रमाणे आता मोबाईल हा मूलभूत गरजेपैकी एक झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नेटवर्कमुळे नागरिक, व्यापारी, ऑनलाइन काम करणारे, इंटरनेट बँकिंग वापरणारे, ऑनलाइन क्लासेस करणारे शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे जियो मोबाईल कंपनीचे नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
कंपनीकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा कडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसुन येत आहे.त्यामुळे मोबाईल टॉवर शोभेची वस्तू बनले आहे.ग्राहकानी हजारो रुपयांचे मोबाईल घेऊन सुध्दा नेटवर्क नसल्याने खिलोने झाले आहेत.नेटवर्क नसल्याने मोबाईलवर बोलने सुध्दा होत नाही.कधी इंटरनेट काम करत नाही कधी पुर्ण रेंज जाते अशी जिओची परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी त्वरित तांत्रिक बाबी तपासून पुर्वी प्रमाणे सेवा द्यावी अशी मागणी वडसी, गोंदेडा, खातोडा, केवाडा, पेट येथील मोबाईल ग्राहकांनी केली आहे.