तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
७४ चिमुर विधानसभा मतदारसंघ करीता महाविकास आघाडी व मित्र पक्ष तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सतिश मनोहरराव वाजुरकर भरणार नामांकन अर्ज सोमवार दिनांक २८/ १०/ २०२४ ला
महाविकास आघाडी व मित्रपक्षचे अधिकृत उमेदवार डॉ.सतिश मनोहरराव वारजुकर हे दिनांक २८/१०/२०२४ ला दुपारी. १ वाजता पंचायत समिती समोर पासून शक्ती प्रदर्शन सह सुरुवात करुन आणि तहसील कार्यालय पर्यंत हजारोचा संख्येने तहसील कार्यालय येथे निवडणूक अधिकारी मा.श्री किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या कडे नामांकन अर्ज दाखल करणार. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडी व मित्रपक्ष यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चिमुर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील , महाविकास आघाडी व मित्रपक्ष यांनी केले यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार,गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब,अनिरुद्ध वनकर,यांच्या प्रमुख उपस्थित भव्य रॅलीच्या माध्यमातून आपले उमेदवार डॉ.सतिश मनोहरराव वारजुकर भरणार उमेदवारी अर्ज