शेतकरी राजा चिंतेत
तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमूर:- सततच्या पावसाळी वातावरणाचा फटका धान पिकाला बसला आहे. त्यामुळे धान पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.मावा, तुडतुड्धाने शेतकऱ्यांच्या हातात येत असलेले धानाचे पिक फस्त होत असल्यामुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास तुडतुड्याने हिसकावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली. शेतकरी राजाही सुखावला. धान पिकाचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात धानाला लाल्या व मावा तुडतुड्या रोगाने शेतातील उभ्या धान पिकाची नासधूस झाली. त्यामुळे हातात आलेले धानाचे पिक घरी किती येईल? धानाच्या कापणी आणि मळणीचा खर्च देखील परवडण्यासारखा नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र तालुक्यात दिसतं आहे.