समस्यांची सोडवणूक न झाल्यामुळे घेतला निर्णय – शिवाजीराव माने
एस पी दळवी
उमरखेड
उमरखेड तालुक्यातील चातारी येथील विविध प्रकारच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून या समस्यांची अद्यापही सोडवणूक न झाल्याने येथील ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
चातारी ते ब्राह्मणगाव आणि चातारी ते कोप्रा या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्या रस्त्याचे काम करून द्या म्हणून अनेकवेळा मागणी करूनही अश्वासनाच्या पलीकडे काहीही झालेले नाही. तसेच गावातील अंतर्गत वार्ड क्रमांक २ च्या मुख्य रस्त्याने खरुस पांदण व उंचवडद पांदण रस्त्याचे प्रचंड पाणी वाहून या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या लोकांच्या घरात पाणी शिरून दरवर्षी लोकांचे प्रचंड नुकसान होते अगदी या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येते ते पाणी गावाच्या बाहेरून वळविण्याचे केवळ आश्वासन मिळालेत त्याच बरोबर वार्ड क्रमांक ३ मध्ये वरच्या बाजूने कॅनॉल असल्याने व ते काम बरोबर झाले नाही त्यामुळे वार्ड क्रमांक ३ च्या वस्तीतील बऱ्याच नुकसान होते.
विकास कामे झाली नसल्याने गावात अनेक समस्या आहेत पण प्रामुख्याने वरील नमूद केलेल्या समस्या गंभीर स्वरूपाच्या असून सुद्धा आम्हाला वेळोवेळी फक्त आश्वासनेच मिळालीत आणि समस्या जशाच्या तश्याच आहेत. म्हणून यावर ठोस निर्णय होत नसेल तर आम्ही या निवडणुकीवर नाईलाजाने बहिष्कार घालीत आहोत.
सुज्ञ नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालणे योग्य नाही याची आम्हाला जाणीव आहे परंतू नाईलाजाने हा निर्णय आम्हाला घ्यावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शिवाजीराव माने, संजय पसलवाड, खुशाल माने, प्रकाश भवर, सुभाष धात्रक, अशोक हामंद सह ग्रामस्थ उपस्थित होते.