शहर प्रतिनिधी
उबेद कुरेशी
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग व ज्ञानदीप माध्यमिक, प्राथमिक आश्रम शाळा तांबोळा तसेच ज्ञानगंगा आश्रमीय विद्यामंदिर खळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 ऑगस्ट 2024 वार शनिवारला इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी लोणार येथील श्री मंगल कार्यालय या ठिकाणी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बुलढाणाचे अध्यक्ष एड. साहेबराव सरदार साहेब हे होते तर उद्घाटक म्हणून माजी न्यायमूर्ती वामनराव सांगळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये लोणार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री जंगलसिंग राठोड, आनंदराव चनखोरे साहेब, डी.पी.इंगोले साहेब, युवा उद्योजक शंतनू मापारी, प्रा.वसंत मापारी, माजी उपसभापती मदनराव सुट्टे तसेच सदानंद पाटील हे लाभले होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवराय, क्रांतीसुर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमापूजनाने झाली.सुरुवातीलाच मुख्याध्याक तुळशीदास घेवंदे यांच्या नेतृत्वाखाली समीरा व भाग्यश्री आणि इतर मुलींच्या संचाने स्वागत गीत सादर केले .या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या टीमने प्रोजेक्टर द्वारा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी वामनराव सांगळे तसेच गट शिक्षणाधिकारी जंगलसिंग राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव सरदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विविध योजनांच्या बाबतची माहिती दिली तसेच मुख्याध्यापक तुळशीदास घेवंदे, मुख्याध्यापक अनंत काळे व मुख्याध्याक गणेश सानप यांचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन करून इतर बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पत्रकाद्वारे गावोगावी द्यावी असे आयोजकांना आवाहन केले .या कार्यक्रमासाठी अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते.त्यामध्ये प्रामुख्याने माणिकराव राऊत सरपंच धायफळ ,लक्ष्मणराव आटोळे तंटामुक्ती अध्यक्ष तांबोळा, रवींद्र गोवर्धन राठोड माजी उपसरपंच तांबोळा, राहुल आनंदा मोरे माजी सरपंच तांबोळा,भीमराव गवई मांडवा, लहाने साहेब बीबी, शिवाजी डोंगरदिवे सर, संतोष गावडे धायफळ, भरत मापारी सर, कांबळे सर , इंगळे सर, विनोद मोरे तांबोळा, नागसेन साबळे सर ,पत्रकार तथा भाजप नेते उद्धवराव आटोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन विठ्ठलराव घारोड यांनी तर आभार प्रदर्शन अशोकराव ढोणे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी मुख्या.घेवंदे सर काळे सर ,सानप सर, बाजोड सर, ससाने सर, गुंजकर सर, किसन जाधव सर, बलकार सर, घारोड सर, ढोणे सर, गायकवाड सर, पवार सर, कार्तिक काळे सर, वडतकर सर, गायकवाड मॅडम, केदार सर, जाधव सर ,राठोड सर, संतोष राठोड ,पृथ्वीराज चव्हाण, गोवर्धन पवार, विजय चव्हाण ,हनीफ चौधरी, गोविंद राठोड, गजानन गायकवाड, दत्तात्रय नवले, सनी गवई व ज्ञानदीप माध्यमिक -प्राथमिक आश्रम शाळा तांबोळाचे आणि ज्ञानगंगा आश्रमीय विद्यामंदिर खळेगावचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.