शहर प्रतिनिधी
जितेंद्र लाखोटीया / तेल्हारा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना असलेला दिवस आणि स्वच्छ भारत मिशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘स्वच्छता ही सेवा ‘ हा पंधरवडा दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे अशी माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली. तेल्हारा तहसीलदार यांच्या आदेशानुसार तेल्हारा तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानांमध्ये स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या उत्सवाचा एक भाग म्हणून स्वच्छता पंधरवडा 2024 हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संपूर्ण तेल्हारा तालुक्यातील रास्त भाव दुकानदार आपल्या दुकानात स्वच्छता ठेवून सदर पंधरवडा साजरा करणार आहेत. हिवरखेड येथील सेवा सहकारी सोसायटी दुकान नंबर 38 चे संचालक प्रदीप पाटील हे आपल्या रास्त धान्य दुकानात स्वच्छता अभियान राबवताना दिसून आले सदरहू कार्यक्रम राबविण्या करता समाधान सोनवणे ,पुरवठा निरीक्षण अधिकारी कावरे मॅडम, पुरवठा अधिकारी डालके साहेब व टोपले साहेब आदींचे सहकार्य लाभत आहे.