मधुकर केदार
प्रतिनिधी अहमदनगर
त्रिमूर्ति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ढोरजळगाव – ने येथे भारत सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुनील चोळके सरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक मा. श्री. मनोज घाडगे पाटील होते. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी श्री. प्रदीप नवल यांनी केले. महाविद्यालयातील कु. स्नेहल चव्हाण, कु. दिव्या हंडाळ, कु. ऋतुजा दहातोंडे, कु. डोंगरे वैष्णवी, कु. प्रेरणा भालसिंग या विद्यार्थांनींनी मनोगत व्यक्त केले, तसेच श्री. वसंत गाडगे यांनी स्वच्छतेवर कविता सादर केली, श्री. मयूर लिंगायत यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक समन्वयक श्री. परसराम शेळके यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा इतिहास उलगडला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दादासाहेब जवरे यांनी “स्वच्छ भारत दिवस” ही मोहीम राबविणे काळाची गरज बनली आहे, असे सांगून स्वच्छतेचे महत्व विषद केले. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे समन्वयक मा. श्री. मनोज घाडगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सतर्क राहण्यास सांगितले.
या कार्यक्रमास वाणिज्य शाखा प्रमुख श्री. आदिनाथ ब्राम्हणे, विज्ञान शाखा प्रमुख श्री. संदीप घोडेचोर, श्री. कपिल चाबुकस्वार, श्री. आकाश वाघ, श्री. जयराम घोडेचोर, संगणक विभाग प्रमुख श्री. प्रशांत लोखंडे, सौ. निशा सगभोर, कु. प्रियंका कर्डिले, कु. गीता आगळे, कु. प्राजक्ता माने, श्री. सागर पठाडे, श्री. शुभम उकिर्डे, कु. ऋतुजा काळे, कु. पूनम घाडगे, कु. सनोबर शेख, श्री. हरी मोरे आणि सर्व शिक्षेकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागातील विद्यार्थांनी कु. कोमल आव्हाड हीने केले, तर आभार प्रदर्शन कला शाखा प्रमुख श्री. नवनाथ रक्टे यांनी केले.
सदर कार्यक्रमानंतर आज दिवसभर महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात विद्यार्थी सहभागी झाले.